■ पत्रकारांच्या लेखनीतुन तिर्थक्षेत्रासाठी आवाज उठवून विकास साधला पाहिजे! - एस.एम.देशमुख
■ सौताडा येथील मिनी महाबळेश्वर धबधब्याला एस.एम. देशमुख यांची भेट!
■ मराठी पत्रकार परिषदेची सौताडा येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न!
पाटोदा: शिव जागृती न्यूज
पाटोदा तालुक्यातील मराठवाड्यात प्रसिद्ध असलेले "अ"दर्जाचे तिर्थक्षेत्र विकासापासून वंचित राहू नये यासाठी पत्रकाराने आपल्या लेखनीच्या माध्यमातून आवाज उठवून विकासाला साधला पाहिजे असे मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा,पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस.एम.देशमुख सर यांनी सौताडा येथील वनराई येथील महत्वपूर्ण बैठकीत सांगितले.
पाटोदा मराठी पत्रकार परिषद तालुका अध्यक्ष प्रा.सचिन पवार यांची निवड झाल्यानंतर प्रथमच पाटोदा पत्रकारांच्या महत्वपूर्ण बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव विशाल सांळुखे,राज्य कार्यकारिणी सदस्य संपादक अनिल वाघमारे,सरचिटणीस विलास डोळसे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जितेंद्र शिरसाट,मराठी पत्रकार परिषदेचे तालुकाध्यक्ष सचिन पवार,यांची प्रमुख उपस्थित होती.
पाटोदा तालुक्यातील सौताडा रामेश्वर धबधबा हे मराठवाड्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे.मराठी पत्रकार परिषदेचे सर्वेसर्वा व पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस.एम.देशमुख हे पाटोदा पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी सौताडा येथे आले होते.सौताडा येथिल आष्टी परिक्षेत्राचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एस एम देशमुख यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला तर त्यांच्या हस्ते कार्यालयासमोर वृक्षारोपण ही केले.वनविभागाच्या आदरानंतर पत्रकारांची महत्वाची बैठक संपन्न झाली.या बैठकित लोकमान्य टिळक तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन करुन कुटुंबासोबत, पाटोदा तालुक्यातील पत्रकार यांच्यासह अभिवादन करण्यात आले.पत्रकार बांधवासी संवाद साधताना एस एम देशमुख यांनी सांगितले की,मराठी पत्रकार परिषद ही कुणाची खाजगी संस्था नसून ती पत्रकारांची मातृसंस्था आहे.कोणत्याही पदावर येथे कुणीही कायम हक्क सांगु शकत नाही.संघटनेत दुहीचे बीज पेरण्याचा कुणीही प्रयत्न करत असेल ते खपवुन घेणार नाही असेही सांगितले.कोणताही पत्रकार हा माझ्यासाठी कुटुंबातील सदस्य आहे.यावेळी दयानंद सोनवणे,श्रीरंग लांडगे,सय्यद साजेद,अनिल गायकवाड,शेख जावेद,हरीदास शेलार, सय्यद इम्रान,अशोक भवर,पठाण जाकेर,प्रदीप उबाळे,इम्रान सय्यद,सय्यद रियाज,जाकेरखान पठाण,राहुल सोनवणे,बबन पवार,प्रभाकर सुळे,यशवंत सानप,आण्णा शिंदे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते.या बैठकिचे उत्कृष्ट नियोजन पत्रकार हमीद पठाण,संजय सानप व पत्रकार बांधवांनी केले.यावेळी वनरक्षक यादव,वनपाल चौरे,वनरक्षक शिंदे,वन मजूर भाऊसाहेब पेचे,नवनाथ उबाळे,वन मजूर अशोक खामकर,वन रक्षक काळे ताई,वन मजूर इणूसभाई आदी उपस्थित होते.
■ सौताड्याचा धबधबा लेखणीतून महाराष्ट्राला दाखवा!
पाटोदा तालुक्यातील सौताडाचा धबधबा सुंदर आणि प्रसिद्ध असून त्याची प्रसिद्धी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नसून त्यासाठी पत्रकारांनी लेखणीला शस्त्र बनवून सौताड्याचा धबधबा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत जेणेकरून या ठिकाणी पर्यटक जास्त प्रमाणात येतील.
- एस.एम.देशमुख
मराठी पत्रकार परिषद,मुख्य विश्वस्त मुंबई.
■ लेखणीचा उपयोग समाजासाठी होईल!
पत्रकारांची लेखणी ही समाजासाठी त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी असली पाहिजे तेच कार्य पाटोदा तालुक्यातील मराठी पत्रकार परिषदेचे सर्व सदस्य करतील व पत्रकारांचा सर्वांना अभिमान वाटेल असं काम आम्ही सर्वजण करू पत्रकारांच्या अडीअडचणी आणि सन्मान कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेल.
- प्रा.सचिन पवार
मराठी पत्रकार परिषद,अध्यक्ष पाटोदा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा