आ.बाळासाहेब आजबे यांच्या वाढदिवसानिमित्त नोकरी महोत्सवाचे आयोजन


 

■ होतकरू सुशिक्षित युवकांनी भव्य नोकरी मेळाव्यास उपस्थित रहावे - दिपक घुमरे


पाटोदा | शिव जागृती न्यूज


आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे " नोकरी आपल्या दारी " अशा टॅगलाईन देत होतकरू सुशिक्षित तरुणांना या महोत्सवामध्ये निमंत्रित केले जात आहे. आमदार आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त 60 पेक्षा अधिक कंपन्यांना आमंत्रित करून होतकरू तरुणांना नोकरी देण्यासाठी उचललेलं हे महत्त्वाचं आणि आगळवेगळे पाऊल मानले जात आहे.

आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आमदार झाल्यापासून जनतेच्या हिताचे काम केले असून शेतकऱ्यांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत आता होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच सुशिक्षित युवकांना नोकरी देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल वाढदिवसानिमित्त उचलले आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील होतकरू व सुशिक्षित युवकांना नोकरी महोत्सवा मधून नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जात असून या महोत्सवामध्ये 60 कंपन्या सहभाग घेणार आहेत तरी होतकरू युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिपक दादा घुमरे यांनी केले आहे.


■ नोकरी महोत्सवासाठी...


आमदार बाळासाहेब आजबे काका यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नोकरी महोत्सवासाठी ऑनलाईन सदस्य नोंदणी सुरू असून तसेच ऑफलाइन अर्ज मिळवण्यासाठी सुद्धा आष्टी पाटोदा शिरूर या तीनही ठिकाणी व्यवस्था केली असून त्याची माहिती फेसबुक व्हाट्सअप वर सर्वांना मिळत आहे. त्यामुळे युवक वर्ग अधिक समाधान व्यक्त करत आहे, हा कार्यक्रम गांधी विद्यालय कडा  येथे असून कार्यक्रम सकाळी 9 ते 5 या वेळेत राहील .


■ आ.काकांचा वाढदिवस देखील जनतेच्या हिताचा - दिपक घुमरे


आपण सर्वजण वाढदिवस वेगवेगळ्या माध्यमातून करत आहोत परंतु आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा वाढदिवस जनतेचा हिताचाच ठरणार आहे.बेरोजगार व होतकरू युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे.यामध्ये 60 पेक्षा अधिक नामांकित कंपन्या सहभाग घेणार आहेत. त्यामुळे युवकांना अधिक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खऱ्या अर्थाने आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा वाढदिवस जनतेच्या हिताचा ठरणार आहे.

- दिपक दादा घुमरे 

राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बीड.

टिप्पण्या