आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांचा आज अभिष्टचिंतन वाढदिवस काका म्हणहे शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांच्या अडचणी समजून घेणारे व्यक्तिमत्व रोजच्या जनतेच्या कामाचा निपटारा करून वेळ मिळाल्यास शेतात कामे करणारा मी पाहिलेला पहिलाच आमदार आहे तालुक्याचे राजकारण करत असताना सरपंच पंचायत समिती सदस्य , सभापती जि प सदस्य आदी पदे भूषवून सतत जनतेच्या संपर्कात रहाणारी व्यक्ती म्हणजे काका स्वतःचे संपर्क कार्यालय करून सतत जनतेच्या संपर्कात ते असतात प्रत्येकाची बाजू एकूण घेऊन स्पस्ट बोलणारे काका जनतेच्या मनाला भावले आहेत , 15-20 वर्ष संघर्ष करून शेवटी कोशिश करनेवालो कि कभी हार नही होती या उक्ती प्रमाणे काकांनी 2019 च्या निवडणुकीत बाजी मारलीच विविध पदावर राहून काकांनी जनसेवा हीच ईश्वर सेवा हि ब्रीद वाक्य घेऊन काका कार्यरत आहेत , आष्टी तालुक्यातही बडा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर आता काय होईल या चिंतेत राष्ट्रवादी परिवार असताना बाळासाहेब आजबे काकांचा राष्ट्रवादी प्रवेश घेऊन पक्षाने त्यांना 2019 मध्ये उमेदवारी देऊन न्याय दिला आणि राजकीस वनवास संपला निवडून येताच त्यांनी जनतेच्या विकास योजना मंजूर करून आणण्यासाठी धडाका लावला गावो गावी जाऊन त्यांनी जनतेचे प्रश्न समजून घेतले आणि ज्या गावात जी समस्या आहे ती तात्काळ सोडवून जनतेचता मनातील टेट झाले आपल्या देशावर खूप मोठे संकट आले मागील दोनवर्षात कोव्हीड ची साथ आल्याने शासनाने सर्व निधी कोविड कडे वळवला तश्या हि परिस्थितीत काकांनी जास्तीत जास्त निधी कसा मतदार संघात येईल याची काळजी घेतली पाटोदा आष्टी व शिरूर या ठिकाणी कोव्हीड सेंटर सुरु करून ऑक्सिजन प्लांट सुरु करून 150 ऑक्सिजन बेड ची व्यवस्था केली काही माणसे घर बाहेर निघत नव्हते त्यावेळी जनतेला भाजीपाला , दूध पुरवून संकट काळी मदत केली कोणत्याही पेशन्ट ला बेड मिळत नसेल तर तात्काळ बेड उपलब्ध करून दिले बाहेर जिल्ह्यातून रेमडेशिवीर इंजक्शन उपलब्ध केलेे. केलेल्या कामाची कधी प्रसिद्धी केली नाहि व केवळ प्रसिद्धी साठी काम केले नाही नाहीतर आजकाल लोकप्रतिनिधी कशाची प्रसिद्धी करतील हे सांगता येत नाही .
नेहमी बोलताना ते सांगत असतात कि जनतेचे छोटे प्रश्न असतात ते सोडवणे आवश्यक आहेत मतदार संघात पाणी उपलब्ध झाल्यास दुष्काळ ग्रस्त मतदारसंघ हा डाग पुसला जाईल म्हणून त्यांनी मतदार संघात वेगवेगळे प्रकल्प मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले शेतीला पाणी हे शेतकऱ्यांशी निगडित काम असल्याने बंधारे आणि केटीवेअर ची कामे व तलावाची कामे हि उत्कृष्ट झाले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली गुत्तेदाराना कामे चांगली करा नाहीतर माझ्याशी गाठ आहे असे ठणकावून सांगणारा नेता कोनत्याही अमिषाला बळी न पडणारा नेता म्हणून काकांची ख्याती आहे. कामावर स्वतः भेट देऊन काम दर्जेदार झाले आहे कि नाही याची खात्री करा असे ते कार्यकर्त्यांना वारंवार सांगत असतात नेता कसा असावा गुत्तेदार पोसणार नसावा नाहीतर या पूर्वीचे नेते म्हणजे सत्तेतुन पैसा आणि पैशातून सत्ता असेच समीकरण होते , जे बोलायचे तेच करायचे आणि जे करायचे तेच बोलायचे अशी कोण व्यक्ती असेल तर ती व्यक्ती म्हणजे बाळासाहेब आजबे काका.. आज हि त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे ज्ज्या दिवशी 2019 मध्ये अचानक दोन दिवसाचे सरकार आले तेव्हा काकांना मुंबई वरून पवार साहेबांचा फोन आला तेव्हा काका शेतात ट्रॅक्टर घेऊन नांगरट करत होते आधी स्वतःचा व्यवसाय करा असे ते कार्यकर्त्यांना सांगतात शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकरीच समजून घेऊ शकतो म्हणून काका हेच शेतकरी पुत्र आहेत .
शब्दांकन
दिपक घुमरे
पारगाव घुमरा ता पाटोदा जिल्हा बीड
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा