सौताडा जि प मा शाळा 10 वी विद्यार्थी सन 1999 च्या बॅच चे स्नेहसंमेलन संपन्न


 


पाटोदा : प्रतिनिधी 

1999 च्या दहावीच्या बॅचचे आज दिनांक 29/10/2022 रोजी स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, डिफेन्स, पत्रकारिता, प्रगतीशील शेतकरी, व्यापारी वर्गात काम करणारे सर्व वर्गमित्र एकत्र जमले. सर्व वर्ग मित्रांचा एकत्रित गप्पांचा कल्लोळ आणि त्या कल्लोळामध्ये यांनी पहिली ते दहावी दहा वर्षांमध्ये जे दिवस एकमेका बरोबर आनंदी वातावरणात घातले, त्याला जो उजाळा दिला तो अद्वितीय असा होता. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सर्वजण पुन्हा एकदा बालवयामध्ये दिवसभर रमले. अशा प्रकारच्या स्नेहसंमेलना मधून प्रत्येकाला जीवनामध्ये एक नवचेतना मिळते. अशीच नवचेतना सर्व जण येथून घेऊन गेले. विशेषता प्रत्येकाने आपले मनोगत खूप उत्तम प्रकारे व्यक्त केले त्यामध्ये पी.एस.आय. सोहन पेचे, युवा उद्योजक व पत्रकार यशवंत सानप, आदर्श शिक्षक शरद शिरसाट, बाजीराव पुलावळे, भागवत सानप, डॉक्टर राम शिंदे, प्रगतिशील शेतकरी रोहिदास सानप, दत्तात्रय टेकाळे, पत्रकार संजय सानप, प्रगतशील शेतकरी रोहिदास सानप, शरद शिंदे दत्तात्रय टेकाळे, झुंबर पेचे, विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अण्णा टेकाळे, नितीन सानप, व्यवसायात प्रगतीपथावर असणारे परमेश्वर सानप, रफिक पठाण, गौतम पोले, सुरेश शिंदे,सोमनाथ सानप अशोक सानप, बाबुराव सानप अशा सर्वांनीच आपापले मनोगत यामध्ये व्यक्त केले. सौताडा गावातील 1999 च्या जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील या बॅचने गावामध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्याची ही प्रथम वेळ आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये गावासाठी जास्तीत जास्त योगदान देण्याचा हेतूने सर्वांनी चर्चा केली आणि आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच या सर्व कार्यक्रमाला रामेश्वर लॉंस चे संचालक यशवंत सानप यांनी हॉल उपलब्ध करून दिला तसेच इतर सर्व वर्ग मित्रांनी भरभरून कार्यक्रमाचा आनंद घेतला त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन.

टिप्पण्या