बीड जिल्हयात ओला दुष्काळ जाहीर करा- भाई विष्णुपंत घोलप



पाटोदा : शिव जागृती न्यूज


 अतिवृष्टीने बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे अतोनात नुकसान झालेले असुन काहीं ठिकाणी विज पडुन पशूहानी, जिवीतहानी झालेली आहे.आता शासनाने पंचनाम्यात वेळ घालण्यापेक्षा बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी असे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप, आष्टी-पाटोदा-शिरुर विधानसभा चिटणीस भाई शिवाजीराव सुरवसे,भाई नारायण थोरवे,भाई रमेशचंद्र देशमाने यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना लेखी निवेदनाव्दारे कळविले आहे.


 शेतकऱ्यांच्या सोयाबीन काही चिखलात आहेत, काहींनी काढणी केली त्यांचे बुचाडे सडले आहेत,काहींनी काढणी केली पण जमा केलेले नाही ते सोयाबीन काळी पडली आहे, तसेच कापसाच्या संदर्भात कापसाच्या पहिल्या वेचणीच्या वाती सततच्या पावसामुळे झाल्या आहेत, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे कापसाची मुळे सडली आहेत,काही कापसाची बोंडे पाण्यामध्ये खराब झाली आहेत, तुर पीकाला जास्त पाऊस जमत नाही.रब्बी ज्वारी पेरणी एक महिना उलटुन गेला तरी अद्याप झालेली नाही.जमीनीत लवकर वाफसा होण्याची शक्यता नाही,भाजीपाला व इतर पीके सततच्या पावसामुळे वाया गेली आहेत. आज शेतकऱ्याने खरीपाच्या पीकासाठी कर्ज काढलेले असतांना रब्बीला कोठुन खर्च करणार? लंपी रोगामुळे जनारांचे बाजार बंद आहेत. अशा एक नाही,अनेक संकटांने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. 


खरीपाला घेतलेले पिककर्ज तो फेडु शकत नाही. रब्बी साठी त्याच्या जवळ पैसा नाही,शेतातील पीके वाया गेली आहेत,पाऊस उघडला की विज वितरण कंपनी नाही चालवलेल्या विद्युत पंपाचे बील मागत आहे. शेतकरी हा वेगवेगळ्या समस्यांने पछाडला आहे. 

  शेतकऱ्याला आता शासनाकडून तात्काळ अर्थसाह्य होणे गरजेचे आहे. तो सर्व बाजुने हतबल झालेला असुन त्याला मायबाप सरकारने वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केंव्हा आणि कोण करणार,सरसकट पंचनामे तर होऊ शकत नाहीत त्यामुळे बीड जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना अनेक संकटातुन मुक्त करावे असे लेखी निवेदनाव्दारे भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे बीड जिल्हा चिटणीस भाई विष्णुपंत घोलप, गोरख झेंड वंचित आघाडी नेते,भाई शिवाजीराव सुरवसे,भाई नारायण थोरवे,भाई रमेशचंद्र देशमाने यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना कळविले आहे. महितीस्तव बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अतुलजी सावे आणि शेकापचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांना कळविले आहे.

टिप्पण्या