प्रगती तांबे व रजनी निंगुळे यांची एमबीबीएस साठी निवड



पाटोदा:शिव जागृती न्यूज

पाटोदा तालुक्यातील तांबाराजूरी येथील माजी सैनिक अशोक नानासाहेब तांबे यांची कन्या प्रगती अशोक तांबे व तांबाराजुरी येथील शिक्षक श्री रामदास निंगुळे सर यांची कन्या कु. रजनी रामदास निंगुळे ची एम.बी.बी.एस. या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाली आहे.


जिद्द, चिकाटी आणि ध्येयाने कु.प्रगती व कु.रजनी ने शैक्षणिक क्षेत्रामध्ये उंच अशी शैक्षणिक भरारी घेतलेली आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. प्रगतीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पाटोदा तालुक्यातील तांबाराजुरी गावाचे नावलौकिक केले आहे. 


प्रगती व रजनी चे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पाटोदा येथे झाले. पुढे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी प्रगतीने बीड निवडले. तर रजनीने लातूर येथे आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. रजनी दहावी बोर्ड मार्च 2020 च्या परीक्षेत पाटोदा तालुक्यातून सर्वप्रथम आली होती. तिला दहावीत मिळालेले यश हे तिने कायम ठेवले असून आता पुणे येथील काशीबाई नवले मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस साठी निवड झाली आहे. तर प्रगतीची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे एमबीबीएस साठी निवड झाली आहे.रजनीला सुरुवातीपासूनच वैद्यकीय शिक्षण व संशोधन क्षेत्रामध्ये काम करन्याची इच्छा व आवड आहे.


अशोक नानासाहेब तांबे यांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये आपले बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्य दला मध्ये नोकरी मिळवली आणि त्यांनी गरीबी ही शाप नसून एक आव्हान आहे. अशा जिद्दीने अशोक तांबे मेजर यांनी देशाची सेवा केली. अशोक तांबे मेजर नेहमी सांगत असतात की आपल्या पिढीने आपल्यापेक्षा पुढील पदावर यश मिळवावे आणि त्यांचे खूप मोठे स्वप्न होते की आपली मुलगी एम.बी.बी.एस. व्हावी नक्कीच प्रगतीने स्वतःचे आणि आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. 


कु.प्रगती तांबे व कु.रजनी निंगुळे यांना वेळोवेळी शिक्षक,आई, वडील यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे.पाटोदा तालुक्यातील सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, आरोग्य ,प्रशासकीय,औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांकडुन कु.प्रगती अशोक तांबे व कु. रजनी रामदास निंगुळे सह श्रीकांत सानप, संतोष पोटे, अभिनव गायकवाड, ऋषिकेश खोमणे आणिि तालुक्यातील इतर सर्व एमबीबीएसला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे यशाचे कौतुक केले जात आहे. शिवजागृती न्यूज परिवारातर्फे या दोघिंचे हार्दिक अभिनंदन व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा.

टिप्पण्या