तांबाराजुरी हायस्कूलचा दहावी बोर्ड परीक्षेचा शंभर टक्के निकाल



शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम


शिव जागृती न्यूज नेटवर्क:

पाटोदा तालुक्यातील नामांकित शाळा माध्यमिक विद्यालय तांबाराजुरी या शाळेचा मार्च 2024 च्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून शाळेने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही निकालाची आणि शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली आहे.

शाळेच्या निकालात प्रथम क्रमांक कु. अमृता संजय नागरगोजे(98%), द्वितीय क्रमांक चि. सोहम गौतम तांबे(96%) ,तर तृतीय क्रमांक  कु कल्याणी केशव तांबे (94.60%) यांच्यासह शाळेच्या निकालात 90% पेक्षा जास्त 8 विद्यार्थी आहेत. तर 17 विद्यार्थी विशेष प्राविण्यांत 75% पेक्षा जास्त आहेत. आणि उर्वरित सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत व एक जण द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

पाटोदा तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात तांबाराजुरी हायस्कूलने नेहमीच ठळक आणि मानाचे स्थान मिळवले आहे. तसेच तांबाराजुरी हायस्कूलमधील शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांचे योगदान नेहमीच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. 

शाळेच्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालां बद्दल शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थी आणि शाळेतील सर्व शिक्षकांसह सर्वच कर्मचाऱ्यांचे  शाळेच्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष श्री दामोधर तांबे काका, शिक्षण संस्थेचे सचिव श्री दिपकराव तांबे तात्या, शिक्षण संस्थेचे इतर सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सानप सर, शिक्षण विभागाचे अधिकारी, पाटोदा तालुक्यातील अनेक मान्यवर, तांबाराजुरी, तळे पिंपळगाव, वाघाचा वाडा येथील पालक व प्रतिष्ठित नागरिक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि तालुक्यातील अनेक शिक्षण प्रेमींकडून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छां देत कौतुक केले जात आहे.

टिप्पण्या