बीड l ShivJagruti News
धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्याच्या समस्या वाढत आहेत, विशेषतः तरुण पिढीमध्ये. नैराश्य ही आता एक गंभीर मानसिक आजार बनला आहे. पालकांनी आणि समाजाने वेळीच यावर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. आजकाल अनेक तरुण आणि लहान वयाची मुले नैराश्याला बळी पडत आहेत. त्यांच्यावर असलेला शैक्षणिक ताण, सोशल मीडियाचा प्रभाव आणि नात्यांमधील गुंतागुंत ही याची काही प्रमुख कारणे आहेत.
** डिप्रेशनची कारण*
हेल्थ-शैक्षणिक आणि करिअरचा ताण :-आजच्या स्पर्धात्मक जगात मुलांवर चांगले गुण मिळवण्याचा, उत्तम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्याचा आणि यशस्वी करिअर निवडण्याचा प्रचंड दबाव असतो.
*सोशल मीडियाचा प्रभाव :* सोशल मीडियावर दिसणारे परफेक्ट आयुष्य, इतरांशी सततची तुलना आणि सायबर बुलिंग यामुळे तरुणांना आपण कमी पडत आहोत असे वाटू लागते.
*नात्यांमधील गुंतागुंत* : प्रेमातील अपयश, मित्र मैत्रिणींशी होणारे वाद किंवा एकटेपणाची भावना हेदेखील डिप्रेशनचे एक कारण आहे. या काळात मुले संवेदनशील असतात.
*हार्मोनल बदल :* तारुण्याच्याकाळात शरीरात अनेक शारीरिक आणि हार्मोनल बदल होत असतात. हे बदल भावनिक अस्थिरता निर्माण करतात आणि नैराश्याचे कारण बनू शकतात.
*लक्षणे पालकांनी वेळीच ओळखावी-*
मित्र-मैत्रिणींपासून दूर राहणे, आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस न वाटणे, जेवणाच्या आणि झोपण्याच्या सवयींमध्ये बदल. सतत उदास आणि निराश वाटणे, सतत चिडचिड करणे असे मत डॉ.जगदीश श्रीराम टेकाळे एम.बी.बी.एस., एम.डी.मानसोपचार तज्ञ (गोल्ड मॅडॅलिस्ट)न्युरो सायकियाट्रिस्ट, व्यसनमुक्ती तज्ञ, सेक्सोलॉजीस्ट यांनी व्यक्त केले. डॉ.जगदीश टेकाळे महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात साई(गवते कॉम्प्लेक्स, डी.पी.रोड,डॉक्टर लाईन,बस स्टॅण्डच्या पाठीमागे येथे उपलब्ध असतात. मो.9518551503, 9545615352

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा