★उद्योग क्षेत्रा बरोबर राजकीय, सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कार्य!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील डोंगरकिंन्ही जिल्हा परिषद गटात उत्कृष्ट उद्योजक अंगद भोंडवे यांच्या नावाची जोरदार चर्चा असुन डोंगरकिन्ही जिल्हा परिषद निवडणुक लढवावी म्हणून गावोगावी वाडी वस्तीवरील कार्यकर्त्यामध्ये जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. डोंगरकिन्ही सर्कलचा प्रलंबित विकास करण्यासाठी योग्य व सक्षम उमेदवार असल्याची चर्चा दिसत आहे. गोरगरीब लोकाना सढळ हाताने मदत करणारे प्रत्येक व्यक्तीच्या सुख दुखात सामील होणारे समाजकारणामध्ये सक्रिय सहभाग असणारे उत्कृष्ट उद्योजक अंगद भोंडवे यांच्या पाठिशी सर्वसामान्य जनतेची मोठी ताकत असुन अनेक गावातील विकासकामे मार्गी लावलेली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासात्मक कार्यामुळे आणी सर्वसमावेशक व्यक्तिमत्वामुळे अंगद भोंडवे यांना डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटात मतदारांची पसंती मिळत असल्याचे चिञ पाहावयास मिळत आहे. त्यांच्याकडे युवकांची लोकप्रियता कायम असल्याने त्यांनी डोंगरकिन्ही जिल्हा परिषदेची निवडणुक लढवावी अशी मागणी सर्वसामान्य मतदारातुन होत आहे.
★निवडणूक लढण्यासाठी युवकांचे फोन सुरू
अंगद भोंडवे हे सध्या उद्योग क्षेत्रात कार्य करत असले तरी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचं कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा युवकांना मोठ्या प्रमाणात फायदाही होत आहे, त्यामुळे युवकांनी आता एकच सूर धरला आहे. अंगद भोंडवे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवावी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी डोंगरकिन्ही जिल्हा परिषद गटातील सर्व युवक घेतील असेही त्यांना फोन करून सांगत आहेत..

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा