आ.सुरेश धस यांच्यावरील आरोप बिन बुडाचे, व निराधार
पाटोदा: शिव जागृती न्यूज
सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर हल्ला झालेल्या घटनेचा सर्वत्र निषेध केला जात आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी पाटोदा नगरपंचायत चे नगराध्यक्ष राजू (भैय्या) जाधव यांनी केली आहे. मात्र या घटनेचा गैरफायदा घेऊन काही जणांकडून लोकनेते सुरेश (आण्णा) धस यांच्यावर विनाकारण आरोप लावले जात असल्याने नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली.
नगराध्यक्ष म्हणाले, “राम खाडे प्रकरणात आमच्या लोकनेते सुरेश (आण्णा) धस यांचे नाव डागाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आरोप पूर्णपणे खोटे, निराधार आणि राजकीय हेतूने पसरवले गेले आहेत. लोकसेवा व विकासासाठी आयुष्य घालवलेल्या नेत्यावर अशा आरोपांची छाया देखील येऊ देणार नाही.”
यापुढे ते म्हणाले, “आमच्या लोकनेत्यांवर कोणतेही खोटे आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. आमची राजकीय संस्कृती शांतता, विकास आणि परस्पर सन्मानाची आहे. हिंसाचाराला प्रोत्साहन देणे किंवा वैयक्तिक वैर बाळगणे हा आमचा मार्ग नाही, आणि भविष्यातही नसेल.
जनतेमध्ये काही व्यक्तींनी मुद्दाम अफवा पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, “अशा अफवांना बळी पडू नका. सत्य लवकरच समोर येईल.”
नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी प्रशासनाला योग्य ती कारवाई करण्याचे आवाहन करत निषेध नोंदवला.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा