अंमळनेर: शिव जागृती न्यूज
अंमळनेर जिल्हा परिषद गटातून गजानन बेदरे हे आगामी निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळाली आहे. या निर्णयाने तालुक्यातील राजकीय वातावरणात नवा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे गटातील सर्व समीकरणे बदलणार आहेत.
गजानन बेदरे हे मनोज जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय असून, मराठा आरक्षण चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. तालुक्यातील समाजाच्या चळवळीचे नेतृत्व त्यांनी प्रामाणिकपणे केले असून, सामाजिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने जनतेचा आवाज बुलंद केला आहे.
समाजासाठी सतत कार्यरत असलेले "मराठा सेवक" गजानन बेदरे हे समाजातील शेतकरी, युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करत आले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे.
“निवडणुका केवळ राजकीय व्यक्तींनीच नव्हे, तर समाजासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनीही लढवायला हव्यात. कारण खऱ्या अर्थाने जनतेचे प्रश्न जाणणारा आणि लोकांसाठी लढणारा तोच खरा जनप्रतिनिधी असतो.”
स्थानिक पातळीवर त्यांच्या उमेदवारीला मोठा प्रतिसाद मिळत असून, अनेक युवक व समाजबांधव त्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. त्यामुळे अंमळनेर तालुक्यातील ही निवडणूक अधिक चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा