जखमी काळवीटावर कुत्र्यांचा हल्ला ; काळवीटाला वाचवून दिले वन विभागाच्या ताब्यात


 

पाटोदा: शिव जागृती न्यूज 

पाटोदा  शहरातील नगर रोड येथील भरत नाईकनवरे यांच्या बांधकाम समोर दि.8 सकाळी 6.15 वाजता कुत्र्यांच्या भुंकण्याचा गोंगाट ऐकु आला. यावेळी हमीदखान पठाण, मोईज सय्यद, किशोर भाकरे, सय्यद शप्पुसेट (जेसीबी), जावेद शेख ,पठाण शफीक यांनी त्या दिशेने धाव घेतली असता त्याठिकाणी काळवीटावर कुत्र्यांचा कळप हल्ला चढवताना दिसला.त्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून काळवीटाची सुटका करत तिला भरत नाईकनवरे यांच्या बांधकाम समोर आणले. आणि पाणी पाजले .

सय्यद शप्पुसेट यांनी पशुवैद्यकीय डॉ .अशोक वाघमारे यांना बोलावून घेतले.प्रथमोपचार करून वनविभागाचे कर्मचारी शहादेव पवार यांना फोनवरून कल्पना दिली. शहादेव पवार यांनी तात्काळ वन विभागाची गाडी व आपल्या कर्मचाऱ्यासोबत तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जेष्ठ पत्रकार छगन मुळे, अजित हुले,शेख आसिफसेठ, संजय शेवाळे सह अनेक नागरिकांच्या समोर वनविभागाच्या ताब्यात दिले...

सदर काळवीटाच्या पायाला खुराजवळ नायलॉन च्या दोरीचा फास आवळलेला होता, तर पुर्णतः आत जाऊन हाडाला जाऊन अडकला होता, जखम चिघळलेली होती बहुदा त्या काळवीटाने शिकाराच्या तावडीतून जीवाच्या आकांताने सुटका करून घेतली होती परंतु पुढे कुत्र्याच्या टोळक्याने त्याला गाठले होते, त्याचे दैवच बलवत्तर म्हणून त्या दोन्ही आघातातून वाचले.जणू त्यांच्या मागे काळ लागला होता पण वेळ आली नव्हती.

टिप्पण्या