पाटोदा : शिव जागृती न्यूज
स्वामी समर्थ केंद्र, पाटोदा येथे दत्त जयंती उत्सवाची सांगता आज भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी पाटोदा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी उपस्थित राहून स्वामींचे दर्शन घेतले, शुभेच्छा दिल्या आणि आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना नगराध्यक्ष जाधव म्हणाले की, स्वामी समर्थ केंद्राच्या विकासासाठी लोकनेते आमदार सुरेश (आण्णा) धस यांच्या माध्यमातून आणि महानंदा दूध संघाच्या संचालिका प्राजक्ताताई धस यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायतीमार्फत २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नगराध्यक्ष राजू भैया जाधव यांनी वारंवार पाठपुरावा करून हा निधी मिळवून देण्यात यश मिळवले असल्याचा त्यांनी उल्लेख केला.
तसेच पुढील कामांसाठीही स्वामी समर्थ केंद्राला निधीची कमतरता जाणवू दिली जाणार नाही, असेही त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमात स्वामी समर्थ केंद्रातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजची महाआरती श्री जय जाधव व सौ. ऐश्वर्या जय जाधव यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा